Ad will apear here
Next
मांसाहारी पदार्थ + भात, पुलाव, बिर्याणी, रायती
शरीराला उपयुक्त ठरतील असे घटक खाद्यपदार्थांमधूनच मिळाले, तर औषधे घेण्याची गरजच उरणार नाही. मांसाहार हा अशा काही घटकांचा स्त्रोत आहे. मांसाहारी पदार्थाच्या अनेक पाककृती जयश्री कुबेर यांच्या या पुस्तकातून शिकायला मिळतात. अंड्यापासून करीसारखे अन्य पदार्थ तयार करता येतात, तर चिकनपासून अनेक चमचमीत पदार्थ करता येतात, हे पुस्तकातून समजते. मटण आणि फिश प्रॉन्सचे पदार्थ मांसाहारप्रेमींसाठी मेजवानीच ठरावी.

दुसऱ्या पुस्तकात कुबेर यांनी भाताचे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांतील कृती दिल्या आहेत. नाना प्रकारचे पुलाव, बिर्याणी नि खिचडी त्यांतून शिकायला मिळतात. नॉनव्हेज प्रकारातही अंडी, चिकन, फिश, झिंगा, कोलंबी, मटणापासून बनवता येतील अशा पुलाव, बिर्याणीच्या कृती दिल्या आहेत. अखेरीस चविष्ट रायती शिकायला मिळतात.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १५८
किंमत : १२० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZQSBI
Similar Posts
पराठे, पुऱ्या, रोटी, धिरडी, थालीपीठ + सूप्स, स्टार्टर्स, मॉकटेल्स, बार्बेक्यू पौष्टिक आणि पोटभरी आहार अशी पराठे, धिरडी, थालीपिठांची ओळख आहे. जयश्री कुबेर यांनी हा आहार चविष्ट नि लज्जतदार बनवला आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक जवळ ठेवले, तर रोज वेगवेगळे प्रकार केले तरी वर्षभरही नव्या चवीचे पदार्थ खायला मिळतील. पराठ्यांचे ५५ प्रकार, विविध पुऱ्या, डोसे, आंबोळी, घावन, धपाटे, फुलके, भाकरीच्या कृतीही पुस्तकात आहेत
भात, पुलाव, बिर्याणी, रायती, स्नॅक्स (पारंपरिक) नेहमीचे पदार्थ निराळ्या स्वरूपात नि निराळ्या स्वादात समोर आले, तर जेवणाची लज्जत वाढते. असे लज्जत वाढवणारे पदार्थ पाककलातज्ज्ञ जयश्री कुबेर यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. पहिल्या पुस्तकात त्यांनी भाताच्या निरनिराळ्या पाककृती दिल्या आहेत. भात, भाताचे प्रकार, पुलाव, बिर्याणी हे सर्व व्हेज व नॉनव्हेज प्रकारात करायला शिकवले आहे
गोडाचे पदार्थ (डेझर्ट्स), गोडाचे पदार्थ (पक्वान्न) गोड पदार्थ फक्त सणासुदीच्या दिवशीच खावा, असा काही रिवाज नाही. अनेकांना जेवताना किंवा जेवण झाल्यावर गोडाचा घास लागतो. मग या गोड पदार्थांमध्ये विविधता असायलाच हवी. पाककलातज्ञ जयश्री कुबेर यांची ही दोन्ही पुस्तके गोडाला वाहून घेतलेली आहेत. पहिल्या पुस्तकात नानाविध डेझर्ट्स कशी करावी याविषयी मार्गदर्शन आहे
जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मॉंगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टिया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाइट.... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको? वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language